छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): ट्रेन नंबर 17254 छत्रपती संभाजीनगर गुंटूर एक्सप्रेस गुंटूर छत्रपती संभाजीनगरहून येणारी परळी सिकंदराबाद गुंटूरला जाणारी एक्सप्रेस प्लॅट फॉर्म क्रमांक दोनवर येत आहे. अशी अनाऊंसमेंट परभणी रेल्वे स्थानकावर झाली. आणि सर्वत्र स्टेशनवर छत्रपती संभाजीनगर असा आवाज प्रवाशांच्या कानावर पडला. अनेकांनी तर कानावर पडलेली छत्रपती संभाजीनगर नावाची अनाऊंसमेंट आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. अनेकांनी सोशल मीडियावर शेअर करून आनंद व्यक्त केला.
औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर हे नाव करण्यात आले. त्यामुळे सर्वत्र बोर्ड देखील बदलण्यात आले. परंतु रेल्वे स्थानकावर औरंगाबाद नावच होते. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली होती. परंतु अखेर औरंगाबाद रेल्वे स्टेशन हे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक यावर मंजुरी देण्यात आली होती. यावर काल रेल्वे विभागाने शिक्कामोर्तब करून औरंगाबाद रेल्वे स्टेशन हे नाव बदलून यापूढे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन संबोधले जाईल असे पत्र काढून निश्चिती दिली. यावर छत्रपती संभाजीनगर नावाची अनाऊंसमेंट देखील सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर गुंटूर एक्सप्रेसची अनाऊंसमेंट देखील प्रवाशांच्या कानावर पडला आणि ऐतिहासिक निर्णय असल्याचे उद्गार प्रवाशांनी काढले. काहींनी या अनाऊंसमेंटची रेकॉर्डिंग करून शेअर केली. त्यात... परभणी स्टेशनवर जेव्हा घोषणा झाली... अंगावर काटा आणणारा क्षण छत्रपती संभाजीनगर... असे लिहून व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला त्यात अनाऊंसमेंटमधून छत्रपती संभाजीनगर असा आवाज घुमला.
बोर्डही झळकला; मंगळवारी होणार उद्घाटन
औरंगाबाद रेल्वे स्टेशन हे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक हे नाव करण्यात आले आहे. यापुढे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन असे संबोधले जाणार आहे. तसेच स्टेशनचा कोड सिपीएसएन करण्यात आला असल्याचे रेल्वे विभागाच्या वतीने शनिवारी स्पष्ट केले. तसेच औरंगाबाद नावाचे बोर्ड बदलून छत्रपती संभाजीनगर हे बोर्ड केव्हा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र अखेर बोर्ड देखील रंगविण्यात आले आहेत. मंगळवारी खा. डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते उदघाटन होणार असल्याचे मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना स्पष्ट केले.